Thursday, March 27, 2025

महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याचा कोयत्याने वार करून खून, वीज बिल जास्त आल्याने ग्राहकाचे क्रूर कृत्य…

बारामती : घरातील विजेचे बिल जास्त येते म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या ग्राहकाने मोरगाव (ता. बारामती) येथील महावितरण कार्यालयात तांत्रिक महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने १६ वार करून खून केला. कोयत्याने वार करणाऱ्या अभिजीत पोटे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

रिंकू गोविंदराव बनसोडे (वय ३४ ) असे खून झालेले महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या मूळच्या लातूर शहरातील रहिवासी असून, १० वर्षापूर्वी महावितरणच्या सेवेत दाखल झालेल्या होत्या. त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दहा दिवसांच्या सुटीनंतर त्या बुधवारी मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या.
मोरगाव येथील कार्यालयात त्या एकट्याच असताना सव्वाअकराच्या सुमारास आलेल्या अभिजीत पोटे या व्यक्तीने रिंकू यांना बिल जास्त आल्याचा जाब विचारला. त्याच्याशी बोलत असतानाच अभिजित याने हातातील कोयत्याने एका मागोमाग एक असे १६ वार रिंकू यांच्या हाता-पायावर आणि तोंडावर केले. काही कळायच्या आतच रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. मोरगाव येथे प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे दुपारी तीनच्या सुमारास निधन झाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles