काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्रीनं असा एक गौप्सस्फोट केला होता, त्यामुळं एकच चर्चेला उधाण आलं होतं.
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं दिग्दर्शक, निर्माता किंवा अभिनेत्यावर नव्हे तर एका उद्योगपतीवर गंभीर आरोप करत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला होता. देशातल्या एका बड्या उद्योगपतीनं तिला पैशांची ऑफर देत लग्नाची मागणी घातली होती. ही अभिनेत्री आहे नीतू चंद्रा. नीतू चंद्रानं एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. एका उद्योगपतीनं तिला २५ लाख रुपये देतो, माझी बायको म्हणून मिरव अशी ऑफर दिली होती.
उद्योगपतीनं अशी लग्नाची ऑफर दिल्यानंतर मी लग्नाचा विचारच डोक्यातून काढून टाकल्याचं नीतू चंद्रा म्हणाली. एका उद्योगपतीनं ‘पगारी पत्नी’ बन, अशी ऑफर दिली होती. त्या घटनेनंतर मी लग्नाची विचारही केला नाही.आजच्या घडली मी आर्थिक दृष्ट्याही कोलमडली आहे. मला काम करायचंय पण मिळत नाही, असं नीतूनं तिच्या मुलाखतीत सांगितलं होतं.






