शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट, पुन्हा चर्चांना उधाण!

0
26

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांची आज राज्यसभेत कॅफेटेरिया येथे भेट झालीय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. या सर्व नेत्यांनी नवीन राज्यसभा सभागृहात एकत्रित फोटो काढलाय. हा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केलाय.

“नवीन संसद भवनातील ऊर्जा दिवस! राज्यसभेचं चेंबर हे एक चमत्कार आहे. हा क्षण आदरणीय शरद पवार साहेबांसोबत शेअर केल्याने तो आणखीनच खास बनला. कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि सौहार्दाचा आस्वाद घेतला. खरोखरच लक्षात राहावा असा आजचा दिवस”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत या भावना व्यक्त केल्या आहेत.

https://x.com/praful_patel/status/1704046789987627092?s=20