राज ठाकरेंचा प्रस्ताव अमित शहांनी फेटाळला… संभाव्य युती बारगळली?

0
20

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता. राज ठाकरेंचा हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अमित शहांनी मात्र फेटाळला आहे. केवळ एक जागा देणं निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी राज ठाकरेंना सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असंही अमित शाह राज ठाकरेंना म्हणाल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझाने सदर वृत्त दिले आहे.