Saturday, May 18, 2024

भाजप नेते नितीन गडकरी यांना भाषण करतानाच भोवळ, डायसवरून खाली कोसळले

देशभरात लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरु आहे. याचदरम्यान देशातील बहुतांश भागात पारा ४० अंश सेल्सिअस पार गेला आहे. या कडक उन्हातच राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरु आहेत. अशाच एका भाजपच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. यामुळे प्रचारसभेच्या मंचावरील नेते, कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले. यवतमाळच्या पुसदमध्ये ही घटना घडली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी हे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारसभेला हजेरी लावली. यवतमाळच्या पुसदमध्ये अर्चना पाटील यांची प्रचारसभा होती. या प्रचारसभेत नितीन गडकरी भाषणाला उभे राहिले. भाषणाच्या काही मिनिटानंतर गडकरी यांना भोवळ आली.
गडकरींना भोवळ आल्यानंतर स्टेजवरील कार्यकर्ते मदतीला धावले. त्यांनतर त्यांना स्टेजवरून उपचारासाठी बाजूला नेलं. भोवळ आल्यानंतर त्यांनी काही वेळ विश्रांती केली. त्यानंतर गडकरी यांची प्रकृती स्थिर झाली. काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर गडकरी पुन्हा भाषणाला उभे राहिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles