Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल Video:नवरदेवानं उखाण्यातून दिला शरद पवारांना पाठिंबा, घड्याळ आमचे चोरुन नेले…

Video:नवरदेवानं उखाण्यातून दिला शरद पवारांना पाठिंबा, घड्याळ आमचे चोरुन नेले…

0

राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा करत राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह आपल्या गटाकडे घेतलं. तर, शरद पवार यांना सु्प्रिम कोर्टानं नवं नाव आणि चिन्ह दिलं. त्यानुसार शरद पवार गटाचं नवं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे तर चिन्ह तुतारी आहे. दरम्यान या सगळ्यात आमदारांबरोबरच कार्यकर्तेही दोन्ही गटात विभागले गेले. यावेळी शरद पवारांच्या कट्टर समर्थकानं आपल्या लग्नात एक भन्नाट उखाणा घेतलाय. हा उखाणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, शरद पवार!!! आम्ही पवार साहेबांना सोबत, शेवटपर्यंत पवार साहेबांना सोबत मी पवार साहेबांना सोबत स्वाभिमानाची तुतारी” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.