Nysa Devgan अजय देवगण आणि काजोलची मुलगी नीसा आहे १९ वर्षांची. ती अजून सिनेमात आलेली नाही, पण नेहमीच ती प्रकाशझोतात असते. तिनं काही दिवसांपूर्वी गायिका कनिका कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत नीसा गेली होती. पिंक बाॅडीकाॅन गाऊनमध्ये नीसा पार्टीत पोहोचली, तेव्हा तिच्यावरून कुणाचीही नजर हटत नव्हती. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले. तिनं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टीला हजेरी लावली होती. कनिका कपूरबरोबरही तिनं बऱ्याच पोजेस दिल्या.
नीसाचा मित्र Orhan ने इन्स्टाग्रामवर रिसेप्शन पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. गायक गुरू रंधावाही पार्टीत होता. फॅन्स नीसाच्या लुकवर खूश आहेत. त्यांचं म्हणणं की हा नीसाचा सर्वात बोल्ड लुक आहे.
Rinku Rajguru…आर्चीचा ‘आठवा रंग प्रेमाचा’.. टिझर व्हिडिओ जारी






