घटना ओडिसामधील आमदार भूपेंद्र सिंह यांच्यासोबत घडली आहे. कालाहांडी या ठिकाणी एका क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करताना त्यांना बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात ते जमिनीवर जाऊन कोसळले. दरम्यान त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना त्वरीत जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत आहेत. हा व्हिडीओ काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहे.
क्रिकेट खेलते गिरे विधायक, हुए जख्मी!