व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक पोलीस कर्मचारी बोलत आहे. हा पोलीस कर्मचारी म्हणतो, “नमस्कार मित्रांनो, मी एके पोलीस. एक नवीन स्कॅम चालू आहे. हा व्हिडीओ बघा आणि नंतर आपण भेटू. त्यानंतर व्हिडीओध्ये पुढे एक दुचाकी चालक दिसतो. तो एका ठिकाणी दुचाकी पार्क करतो आणि तोंडाला रुमाल बांधतो. त्यानंतर तो एका दुकानात जातो आणि एक कॉफीची ऑर्डर देतो. कॉफी प्यायल्यानंतर तो दुकानदाराला विचारतो, “किती पैसे झाले दादा?” दुकानदार २० रुपये झाले असे सांगतो. त्यानंतर तो फोन पे वर पैसे देतो आणि दुकानदाराला म्हणतो, “चुकून २० हजार झाले दादा. तुम्ही मला फोन पे करा ना प्लीज” त्यानंतर दुकानदार त्यांना १९९८० रुपये परत करतो. त्यानंतर तो तिथून निघून जातो. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुणेकर सावधान असं तुमच्याबरोबर ही घडू शकते. फोन पे चा असाच वापर करतात हे फ्रॉड लोक”
Home  Featured  अर्थकारण/लाईफस्टाईल  सावधान असं तुमच्याबरोबर ही घडू शकते…Phone pe चा असाच वापर करतात हे...






