लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे मोठं वक्तव्य,म्हणाल्या प्रितमताईला…

0
27

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालीय. पण या मतदारसंघात सध्या पंकजा यांच्या बहीण प्रीतम मुंडे या खासदार आहेत. पक्षाने प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंकजा यांनी आपल्या बहीणीचं तिकीट कापून आपल्याला उमेदवारी मिळाली असली तरी प्रीतम ताईला आपण विस्थापित करणार नाही, असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
माझी उमेदवारी जाहीर झाली ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक आहे. त्यामुळे माझ्या भावना आभाराच्या आहेत. थोडीसी संमिश्र भावना नक्कीच आहेत. कारण प्रीतम मुंडे या गेल्या 10 वर्षांपासून खासदार होत्या. त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणात जात असताना थोडीसी धाकधूक नक्कीच वाटतेय. पण नवीन अनुभव आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

आपल्याला उमेदवारी मिळेल, याची अपेक्षा होती का? असा प्रश्न पंकजा यांना विचारण्यात आला. “अपेक्षा होती. कारण याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फार मोठा धक्का लागला असं नाही. कारण बऱ्याचदिवसांपासून तशा चर्चा सुरु होत्या. पण साहजिकच आहे, जोपर्यंत पक्षाकडून अधिकृतपणे सहीसोबत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते. त्यामुळे मला फार त्याबाबत आत्मविश्वास नव्हता”, असं पकंजा मुंडे यांनी सांगितलं.