पाकीट चोरणाऱ्या चोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. बसच्या गर्दीत त्याने संधी साधत चाकू, कात्रीशिवायच एका प्रवाशाचा खिसा कापला आहे. व्हिडीओत पाहू शकता बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी आहे. तुम्ही नीट पाहाल तर या गर्दीत एका व्यक्तीने त्याच्या पुढे असलेल्या तरुणाच्या मागच्या खिशात हात टाकला आहे. बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या तरुणालाही त्याची माहिती नाही. व्यक्ती त्या तरुणाच्या खिशातून हात काही काढत नाही. गर्दीत कुणाच्याही ते लक्षात येत नाही. तरुण बसमध्ये चढतो तशी ती व्यक्ती त्याच्या खिशातून पाकिटासह आपला हात बाहेर काढते आणि धक्का लागल्यासारखं मागे सरकते.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल ना चाकू, ना ब्लेड….गर्दीत अशी होते ‘पाकीट’ मारी…पहा चोराचा व्हिडिओ