PM किसानचा 17 वा हप्ता कधी मिळणार? 17 वा हप्ता मिळवण्यासाठी ‘हे’ काम करा, अन्यथा…

0
22

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारनं विविध योगना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेद्वोर प्रत्येक वर्षी सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही मदत प्रत्येक 4 महिन्याला 2000 हजार रुपयांचा हप्त्याद्वारे दिली जाते. असे तीन हप्त्यात 6000 रुपये दिले जातात. आत्तापर्यंकत शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हप्ते जमा झाले आहोत. आता 17 वा हप्ता कधी जमा होणार याबाबतची चर्चा सुरु आहे. दरम्यान, तुम्हाला जर 17 वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काही महत्वाची कामे करावी लागतील.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही पहिलं काम eKYC करणं हे आहे. eKYC करणं हे अनिवार्य आहे. तसेच तुम्ही जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक आढळल्यास तुम्ही PM किसानचा 17 वा हप्ता मिळणार नाही. त्यासाठी योग्य ती माहिती भरा. तसेच तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक करणे गरजेचं आहे. आधार कार्ड जर लिंक नसेल तर तुम्हाला 2000 रुपयांचा 17 वा हप्ता मिळणार नाही.