प्राजक्ता माळीची गोविंदांसाठी खास पोस्ट, म्हणाली…

0
36

भगवान कृष्णाचा जन्मोत्सव म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण फार मोठ्या आनंदात देशभरात साजरा केला जातो. सेलिब्रेटीही त्यांच्या चाहत्यांना गोपाळकाल्याच्या शुभेच्छा देतायेत. तसेच हंडी फोडणासाठी सज्ज झालेल्या गोविंदाना मनोरे रचताना काळजी घेण्याचं आवाहन करतायेत. दरम्यान प्राजक्ता माळीने तिच्या चाहत्यांना गोपाळकाल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच प्राजक्ताने इंस्टाग्रामवरुन गोविंदासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ताने लिहिते, ”सगळ्यांना गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व गोविंदान्नो, जपून मनोरे रचा. स्वतःची काळजी घ्या.” सिर सलामत तो पगड़ी पचास।” अशी पोस्ट प्राजक्ताने शेअर केली आहे. यावर चाहत्यांनी देखील कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ”तुम्हाला गोपाळकाला निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन, गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा घड्यात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा.” आणखी एकाने लिहिले, एकतर हृदय आहे किती वेळा जिंकणार.