Prarthana behere
प्रार्थना बेहरे हिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती एका सोफ्यावर बसून कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. भेटा माझ्या घरातील नव्या पाहुण्याला…, असे तिने या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे. मूव्ही असे तिच्या घरातील छोट्याशा पाहुण्याचे नाव आहे. तिचा हा छोटा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा पाळीव कुत्रा आहे.