अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण आज करण्यात आली. राम मंदिराच्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली. अयोध्येतील हा सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी आले. 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दिपोत्सव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लाऊन आणि रामाची पूजा करून आजचा सोहळा पुन्हा एकदा साजरा केला.
22 तारखेला राम मंदिराचं लोकार्पण होईल तेव्हा देशातल्या जनतेने दिवाळी साजरी करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वत: त्यांच्या निवासस्थानी दिपोत्सव साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानतल्या या दिपोत्सवाचा व्हिडिओ शेअर केला आहे.