अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला केवळ 11 दिवस उरले आहेत. या शुभ सोहळ्याचा मी देखील साक्षीदार होणार हे माझे भाग्य आहे. परमेश्वराने मला या अभिषेक दरम्यान भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक साधन बनवले आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांचे अनुष्ठान विधी सुरू करत आहे. मी सर्व लोकांकडून आशीर्वाद मागत आहे. या क्षणी, माझ्या भावना शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे, परंतु मी माझ्या बाजूने प्रयत्न केला आहे.” असे ते म्हणाले, तसेच पंतप्रधान मोदी अष्टांग योगातील यम नियमांचे पालन करून अनुष्ठान करणार आहे.
अष्टांग योगाच्या पहिल्या भागाबद्दल म्हणजे ‘यम’बद्दल बोललो, तर यम हा नियम आहे जो माणसाला समाजात नैतिकतेने जगायला शिकवतो. यम हा मूळ शब्द ‘यम उपरमे’ पासून आला आहे, ज्याचा अर्थ निवृत्त होणे असा होतो.