‘तुम ही हो’ या गाण्यावर भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमँटिक डान्स…

0
33

पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायलादेखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात.एका कॉलेजमधील असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात शिक्षिका ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दरम्यान, आता एक शिक्षिका विद्यार्थ्यासोबत ‘आशिकी २’ चित्रपटातील गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कॉलेजमधील एका वर्गात फेयरवेल पार्टी साजरी केली जात आहे, यावेळी वर्गात सजावटदेखील केल्याचे दिसत आहे. यावेळी एक विद्यार्थी शिक्षिकेसोबत ‘आशिकी २’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे.