Tuesday, March 18, 2025

अजित पवार म्हणाले, भटकती आत्मा कोणाला म्हणाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारेन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुण्यात सभा घेतली. या सभेत बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली. मोदींनी पवारांचा भटकती (अतृप्त) आत्मा असा उल्लेख केला. मोदींनी शरद पवारांचं नाव घेतलं नव्हतं, मात्र त्यांचा रोख शरद पवारांकडे होता अशी चर्चा आहे. मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख (अजित पवार गट) अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्मा नक्की कोण आहे ते विचारणार आहे. तसेच त्यांनी नेमक्या कोणत्या उद्देशाने ते वक्तव्य केलं हेदेखील विचारेन.

अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नेमकं कोणाबद्दल बोलले ते माहिती असायला मी काही ज्योतिषी नाही. त्यांच्या मनात नक्की कोण ते… त्याबाबतीत मी पुढच्या सभेत मोदींना विचारेन… आमची पुढची प्रचारसभा जिथे असेल आणि तिथे मीदेखील असेन तर मी तेव्हा मोदींना त्या वक्तव्याबाबत विचारेन… भटकत्या आत्म्याचं नाव काय तेदेखील विचारेन. त्यांनी नेमका कोणत्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलं त्याबाबतही विचारेन. त्यांनी मला नाव सांगितलं की मी ते तुम्हाला (प्रसारमाध्यमांना) सांगेन.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles