Pushpa Sami Sami..
‘पुष्पा’च्या गाण्यांपासून ते डायलॉगपर्यंत आजही सोशल मीडियावर बोलबाला आहे. दरम्यान, ‘सामी-सामी’ (Sammi Sammi Song) गाण्याची हुक स्टेप सर्वांची आवडती डान्स स्टेप झाली आहे. सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच या गाण्याचे व्हिडी ओ शेअर करत होते. दरम्यान, एका आजीचा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये त्या ‘सामी-सामी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील ‘सामी-सामी’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ‘सामी-सामी’ गाणे ऐकून आजीने डान्स करायला सुरुवात केली. त्यानंतर, त्यांनी असा जबरदस्त डान्स केला, जो पाहून सगळेच थक्क झाले.
हे सुध्दा वाचा..
एका लग्नाची गोष्ट… हनीमून नंतर नवरी लाखोंचा ऐवज घेऊन गायब…नवरोबा थेट पोलिसांकडे






