Pushpa…सामी सामी गाण्यावर श्रीवल्लीसह गोविंदाही थिरकले…. व्हिडिओ

0
713

डीआयडी सुपर मॉम्स ३’ फिनालेचा अधिकृत प्रोमो व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना आणि गोविंदा एकत्र डान्स करताना दिसत आहेत. या दोघांनी ‘पुष्पा’ चित्रपटाच्याच्या ‘सामी सामी’ या गाण्याच्या काही हुक स्टेप केल्या. गोविंदा हे एक उत्तम अभिनेताच नाही तर डान्सरही आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. गोविंदा यांनी या गाण्यावर रश्मिकाच्या सर्व स्टेप हुबेहुब कॉपी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.