Pushpa…मैं झुकेंगा नहीं… सिक्वेल ‘पुष्पा दि रुल’ ची तयारी सुरू

0
302

Pushpa

इंडिया ग्लिट्झच्या वृत्तानुसार, दिग्दर्शक सुकुमार यांनी ‘पुष्पा’च्या सिक्वेलची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचं बजेटही ठरवलं असून जुलै महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं शूटिंग सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी, असं सांगितलं जात होतं की, ‘पुष्पा-द राइज’ला जगभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे स्क्रिप्टमध्ये अनेक बदल आवश्यक आहेत अशी या चित्रपटाच्या टीमचं मत आहे. त्यामुळे दिग्दर्शक सुकुमार ‘पुष्पा – द रुल’ची स्क्रिप्ट पुन्हा लिहिण्यात व्यग्र होते.आता ही स्क्रिप्ट पूर्ण झाल्याचं म्हटलं जात आहे.