उद्धव ठाकरेंना राममंदिर उद्घाटन सोहळ्याचं स्पीड पोस्टाने निमंत्रण मिळालं

0
18

गेल्या काही दिवसांपासून राममंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते. उद्धव ठाकरेंना राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नसल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली असून राममंदिर ट्रस्टकडून उद्धव ठाकरे यांना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांना राममंदिर सोहळ्याचे निमंत्रण नसल्याने भाजपवर टीका केली जात होती. या संपूर्ण वादावर आता पडदा पडला असून उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टाने राममंदिर ट्रस्टकडून उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रतिष्ठानचे महासचिव चंपक राय यांनी उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केले आहे.