Saturday, May 18, 2024

एकनाथ खडसेंचा भाजप कार्यालयातून सुनेचा प्रचार… मंत्री गिरीश महाजन म्हणाले, आधी त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा…

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु त्यांचा अजूनही पक्षप्रवेश झालेला नाही. पक्ष प्रवेश झालेला नसताना एकनाथ खडसे यावल येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात जावून बसले. त्यांनी भाजपच्या कार्यकत्यांना प्रचाराबाबत सूचनाही केल्या. बैठकाही घेतल्या. पक्षात नसताना खडसेंच्या या बैठकांमुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र चांगलेच गोंधळात पडले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर थेट भाष्य केले आहे. ते म्हणाले, खडसे कधी म्हणतात, मी राष्ट्रवादीचा तर कधी भाजपचा आहे. मात्र,सध्या तरी ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत.त्यांनी अजूनही आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. यामुळे एकनाथ खडसे यांनी आगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावं असा खोचक सल्ला दिला आहे.
खडसेंच्या भूमिकेमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे खडसेंना घरात सगळेच पक्ष ठेवायचे आहेत. यावरून त्यांची भूमिका संधीसाधूपणाची असल्याचे दिसून येत असल्याची बोचरी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles