Rinku Rajguru…आर्चीचा ‘आठवा रंग प्रेमाचा’.. टिझर व्हिडिओ जारी

0
629

Rinku Rajguru Archi अभिनेत्री रिंकू राजगुरूने आठवा रंग प्रेमाचा’ या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिले आहे,”सगळ्यांचे रंग बदलतात. जेव्हा माणसं प्रेमात पडतात. आठवा रंग प्रेमाचा 17 जून पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सैराट चित्रपटामुळे रिंकूला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामध्ये रिंकूनं आर्ची ही भूमिका साकारली. चित्रपटामधील रिंकू आणि आकाशच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिंकूच्या मेकअप आणि कागर या मराठी चित्रपटांना तर 100, अनपॉज्ड,200 हल्ला हो या हिंदी वेबसीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिंकू तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.