Rinku Rajguru..रिंकूचा अत्यंत वेगळ्या विषयावरचा ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने ‘अल्ट्रा मराठी बझ ’ ला दिलेल्या मुलाखतीत बऱ्याच गोष्टींवर खुलासा केला आहे. यात रॅपिड फायरमध्ये विचारलेल्या प्रश्नांची तिने खरी आणि छान उत्तरं दिली आहेत. यात रिंकूला तिची वाईट सवय काय याबद्दल विचारलं तर तिने असं सांगितलं, ”माझी एक सवय आहे ज्याचा कधीतरी मला त्रास होतो. मी पटकन लोकांना जीव लावते आणि खूप जास्त जीव लावते. याचा मलाच बरेचदा त्रास होतो आता ती चांगली सवय आहे का वाईट याची कल्पना नाही पण मला कधीतरी त्रासदायक ठरतं.”