Monday, May 20, 2024

‘गर्लफ्रेंड’ कमकुवत लोकांची असते. शूर लोक लग्न करुन संकटाचा सामना करतात, रितेश देशमुखचा धमाल व्हिडिओ…

Ritesh Deshmukh…
रितेश देशमुख यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या रिल व्हिडीओत तो गर्लफ्रेंड आणि पत्नी याबाबत सांगताना दिसत आहे. यात तो म्हणतो की गर्लफ्रेंड ही कमकुवत लोकांची असते. पण शूर लोक तर लग्न करुन संकटाचा सामना करतात. यावेळी तो पहिलं वाक्य बोलून झाल्यानंतर कॅमेरा जिनिलियाच्या दिशेने वळवतो. या व्हिडीओ त्याचे हावभाव अतिशय मजेशीर पाहायला मिळत आहे.

रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना ‘दर के आगे जीत है’ असे कॅप्शन दिले आहे. त्यासोबत त्याने हा व्हिडीओ जिनिलियालाही टॅग केला आहे. त्यावर जिनिलियानेही कमेंट करत ‘किती वाईट’ असे म्हटले आहे. दरम्यान रितेशचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles