रितेशने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. रितेशच्या दोन्हीही मुलांनी रविवारी एक फुटबॉलची स्पर्धा जिंकली. त्यावेळी त्यांना प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी घरी येऊन काय केलं, याचा एक व्हिडीओ रितेशने पोस्ट केला आहे.
रितेशने या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे. “रियान आणि राहिल या दोघांनीही फुटबॉल स्पर्धेत जिंकलेले मेडल्स मदर्स डे निमित्ताने आजीला दिले आहेत. आयुष्यातील काही क्षण अनमोल असतात. तुमच्या पालकांबरोबर वेळ घालवा. मुलांबरोबर वेळ घालवा”, असे कॅप्शन रितेशने दिले आहे.