Monday, May 20, 2024

रोहिणी खडसे भाजपात जाणार? रोहिणी खडसे म्हणाल्या…

एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्यामुळे आता त्यांची कन्या रोहिणी खडसे यादेखील भाजपात परतणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. रक्षा खडसे यांनी त्यांच्या नणंदेला भाजपात येण्याचं आवाहनही केलं आहे. या सर्व चर्चांवर रोहिणी खडसे यांनी उत्तर दिलं आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या, “मी आधीही माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्याबरोबर राहून पक्षासाठी काम करणार आहे. मी याच पक्षाच्या विचारधारेवर भविष्यातही काम करणार आहे. माझ्या भूमिकेबाबत कोणाच्याही मनात संभ्रम असण्याचं काही कारण नाही. याच पक्षात राहून मी माझी २०२४ ची विधानसभेची निवडणूक लढवणार आहे.” रोहिणी खडसे यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी त्यांच्याबद्दल रंगत असलेल्या राजकीय चर्चांवर प्रतिक्रिया दिली.

रोहिणी खडसे म्हणाल्या, इथे बारामतीसारखी परिस्थिती नाही. रावेरमध्ये विचारांची लढाई आहे, कुटुंबाची नाही. रक्षा खडसे भाजपाच्या विचारधारेवर निवडणूक लढवत आहेत आणि मी शरद पवारांच्या विचारांवर काम करतेय. मी कुठल्याही व्यक्तीविरोधात निवडणूक लढवत नाहीये. विचारधारेला घेऊन आम्ही दोघी निवडणुकीला सामोऱ्या जात आहोत. माझा लोकांवर विश्वास आहे, लोक महाविकास आघाडीच्या पाठिशी उभे राहतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles