अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी…गाण्यावर शिक्षिकेचा भन्नाट डान्स Video

0
63

शिक्षक नेहमी विद्यार्थयांवर रागावलेले आणि अभ्यासाबाबत बोलताना दिसतात. त्यामुळे त्यांची एक कणखर स्वभावाची व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात प्रतिमा निर्माण होते. पण ते देखील एक माणूस आहेत, त्याला नाचायला, गाणे आणि जीवनाचा आनंद घेणे देखील आवडते. शिक्षकांना जेव्हा ही संधी मिळते तेव्हा ते ती संधी सोडत नाहीत. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक शिक्षिका भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही शकता, शाळेच्या मैदानावर एक शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मराठमोळ्या “अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी” या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. तर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी देखील आपल्या शिक्षिकेचे डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहेत.