काय झाडी, काय डोंगार…आ.शहाजीबापू पाटील थेट ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये… व्हिडिओ

0
6744

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं ओक्केमध्ये’ या दमदार डायलॉगनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या शाहाजी बापू पाटलांची गेली अनेक दिवस चर्चा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यादरम्यान महाराष्ट्रातून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटातील शाहाजी बापू पाटील यांची दमदार ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झालं, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळाला मात्र शाहाजी बापू पाटलांच्या या डायलॉगची हवा काही कमी झालेली नाही. पाटलांचा हाच दमदार अवतार चला हवा येऊ द्याच्या मंचावरही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शाहाजी बापू पाटील त्यांच्या पत्नीसह झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.