अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही टोमॅटो दरवाढीचा धसका, व्हिडिओ व्हायरल…

0
24

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. टोमॅटोच्या वाढत्या दरांबद्दलच तिने हा मजेशीर व्हिडीओ शूट केला आहे. मात्र हा व्हिडीओ नेटकऱ्यांना पसंत पडला नाही. आपल्या ‘धडकन’ या चित्रपटातील एका गाण्याच्या पार्श्वभूमीवर शिल्पाने हा व्हिडीओ शूट केला होता. त्यावर सध्या नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय.

व्हिडीओत शिल्पा एका दुकानात टोमॅटोंची खरेदी करताना दिसतेय. टोमॅटो पाहून शिल्पा खुश होते आणि विकत घेऊ लागते, मात्र इतक्यात तिला ‘तुम्हारी हिंमत कैसे हुई, खबरदार जो मुझे छुने की कोशिक की तो’, असा तिच्या ‘धडकन’ या चित्रपटातील डायलॉग ऐकू येतो. ‘टोमॅटोची किंमत माझ्या हृदयाची धडधड वाढवत आहेत’ असं कॅप्शन देत तिने हा गमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र शिल्पासारख्या सेलिब्रिटीला टोमॅटोच्या वाढत्या किंमतीची चिंता का वाटावी, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. ‘तू तर टोमॅटोची संपूर्ण फॅक्ट्रीच विकत घेऊ शकतेस’, असं एकाने लिहिलं