निष्ठावान शिवसैनिकांपेक्षा नवीन उतावीळांनाच पक्षात पदं मिळतायत..राऊतांचा ठाकरेंना घरचा आहेर…

0
19

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे सख्खे बंधू असलेले संदीप राऊत हे कार्यकर्त्यांमध्ये अप्पा राऊत म्हणून ओळखले जातात. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संदीप राऊत यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये शिवसेना ठाकरे गटात एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. नेत्यांच्या पुढं पुढं करणाऱ्यांनाच पक्षात पद मिळत असल्याचा आरोपही या पोस्टमध्ये केल्याचं दिसत आहे. संदीप राऊत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी असून, त्यांच्या या पोस्टचा रोख नेमका कोणाच्या दिशेनं आहे याबद्दलच्या उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.

अलिकडे पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पारंपारिक शिवसैनिकांपेक्षा नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या नवं उतावीळांनाच डोक्यावर घेतलं जातंय, असं या पोस्टमध्ये संदीप राऊत यांनी म्हटलं आहे.