लग्नमंडप म्हटला की, तिथे वर व वधू अशा दोन्ही पक्षांकडील वऱ्हाडी मंडळी, वर-वधू, त्यांचे मित्र-मैत्रिणी असे अनेक लोक उपस्थित असतात. यावेळी लग्नात वधू-वराची एन्ट्री, डान्स यांकडे नेहमीच सर्वांचे लक्ष असतं. हल्ली लग्नात वधू-वराचं प्री-वेडिंग शूटदेखील दाखवलं जातं. पण, तुम्ही कधी लग्नात धूर फवारणी करणारा कोणी आल्याचं पाहिलंय का? नसेलच पाहिलं; पण समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तो लग्नमंडपात आल्याचं दिसत आहे; ज्याला पाहून तुम्हाला हसू येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपात एक जण अचानक येतो आणि तिथे धूर फवारणी करतो. संपूर्ण मंडपात धूर पसरल्याचं पाहून आलेल्या व्यक्ती दुसरीकडे पळतात. यावेळी तिथे काही लोक येतात आणि त्याला धूर मारु नको असं सांगतात, पण तरीही तो थांबत नाही. त्यावेळी एक जण त्याच्या हाताला धरून त्याला तिथून बाहेर काढतो. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून, या व्हिडीओवर “मित्र म्हणालेला, माझ्या लग्नात जाळ अन् धूर करा”, असं लिहिलं आहे.