Sneha wagh…बिग बॉस 3 गाजवणारी स्नेहा झळकणार हिंदी मालिकेत…

0
532

Sneha wagh बिग बाॅस ३ मराठी गाजला तो स्नेहा वाघ या अभिनेत्रीमुळेच. त्या शोमुळे स्नेहा घराघरात पोहोचली. तिनं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बाॅस मराठी शोमध्ये आल्यानंतर आता ती मराठी मालिका करेल असं वाटत होतं. पण नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार स्नेहा आता एका हिंदी मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

‘ना उम्र की सीमा हो’ या मालिकेत स्नेहा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिनं हे सगळ्यांना सांगितलं आहे. ही मालिका २६ जुलैपासून सुरू होणार आहे. रचना मिस्त्री आणि इक्बाल खान या मालिकेत मुख्य भूमिकेत असतील. मराठी अभिनेत्री समिधा गुरू आणि वर्षा दंडाले यांच्याही भूमिका आहेत.