सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वार वाहतं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अशात काँग्रेसच्या महिला नेत्यालाही भाजपने ऑफर दिल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याचं म्हटलं आहे. सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. भाजपवाले पक्षात प्रवेश करा म्हणण्यातसाठी येतात. मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र प्रणितीने विचार केला की मी काँग्रेसची प्रामाणिक आहे.जी गांधी- नेहरूंची काँग्रेस आहे. त्यामध्येच मी राहील असा विचार तिने केला. काँग्रेससाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे बरेच कार्यकर्ते देशभरात आहेत मात्र ज्यांना जायचे आहे ते जातील. प्रणितीच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांच्या मनात काय आहे ते मी सांगू शकत नाही. भाजपवाले येतात प्रवेशासाठी. मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत. प्रणिती देखील स्ट्रॉंग आहे. तिला भाजपसोबत जाणं पटत नाही. लोकांनी तिला तीन वेळेस निवडून दिले म्हणून ते पार्टी सोडून ती जाऊ इच्छित नाही, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं.