विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांना कळकळून हसवणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे सुनील ग्रोवर. कपिल शर्मा शोमधून त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. परंतु काही महिन्यांपूर्वी त्याने हा शो सोडला. हा शो सोडल्यापासून त्याचा एक वेगळाच अंदाज चाहत्यांना बघायला मिळत आहे. आता तो चक्क रस्त्यावर लसूण विकताना दिसला. सुनीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्वतः सुनीलने सोशल मीडियावर पोस्ट केला असून यामध्ये तो बाजारात लसूण विकताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो एकाच स्टूलवर बसलेला असून त्याच्यासमोर लसणाचा ढीग आहे. त्यामधून तो आलेल्या ग्राहकांना वजन करून लसूण विकताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं, “हमारी अटरियां.”