शरद पवारांचा फोटो का वापरता? स्वत:ची ओळख निर्माण करा, सुप्रिम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले

0
25

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना देण्याचा निर्णय दिला. त्याविरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं अजित पवार गटाच्या वकिलांची चांगलीच कानउघाडणी केली. तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात. मग शरद पवारांचा फोटो का वापरता?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारला. निवडणूक प्रचारात शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरता, असा प्रश्न न्यायालयाकडून अजित पवार गटाला विचारण्यात आला. ‘तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात. शरद पवारांसोबत राहायचं नाही असा निर्णय तुम्ही घेतलात. मग आता त्यांचा फोटो का वापरता? आता स्वत:ची ओळख निर्माण करा आणि त्याच्या आधारे निवडणूक लढा,’ अशा सूचना न्यायालयानं अजित पवार गटाला केल्या आहेत.