लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम, ‘या’ पक्षात जाहीर प्रवेश

0
21

प्रसिद्ध लोककलावंत आणि लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. सुरेखा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत हैदराबादच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी काल (२२ जून) पक्षप्रवेश केला.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार हे राजकीय पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. आपल्या घुंगरांच्या तालावर सगळ्यांना नाचवणाऱ्या आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणाऱ्या लोकप्रिय नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.