Taarak Mehta मधील ‘पोपटलाल’ थेट हॉलीवूड चित्रपटात…व्हायरल व्हिडिओने धुमाकूळ

0
517

Taarak Mehta

तारक मेहतामधील पोपटलालची भूमिका साकारणारा अभिनेता श्याम पाठकला घरोघरी ओळख मिळाली आहे. त्याची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. श्याम पाठक मालिकेपूर्वीच हॉलिवूडच्या चित्रपटात झळकला होता. स्वत: अभिनेत्याने या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची एक छोटीशी क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. श्याम पाठकने चीनी चित्रपट ‘लस्ट, Caution ‘ मध्ये छोटी भूमिका बजावली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका पोपटलालपेक्षा खूपच वेगळी होती. इतकंच नाही तर या सीनमध्ये श्याम पाठक अस्खलित इंग्रजी बोलताना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या चित्रपटात श्यामने बॉलिवूडचे दिग्गज अनुपम खेर यांच्यासोबत काम केले होते.