नगर शहरात माळी समाजाच्या जागेचा प्रश्न मार्गी ,महापौर रोहिणीताई शेंडगेचा सत्कार

0
39

माळी समाजाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल

महापौर रोहिणीताई शेंडगे यांचा सत्कार

नगर – नगर शहरातील प्रत्येक समाजाचे संघटन चांगल्या पद्धतीने होत आहेत, या संघटनांच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. परंतु यासाठी हक्काची जागा नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. मनपाचे ओपन स्पेस जर चांगले काम करणार्‍या समाजास दिल्यास त्याचाही विकास होईल. माळी समाजानेही यासाठीच मनपाकडे ओपन स्पेसची मागणी केली होती, सर्वांनी त्यास अनुमोदन देत महासभेने ती पूर्ण केली आहे. ही समाजासाठी चांगली बाब आहे. मिळालेल्या जागेचा सर्वांगिण विकास करुन त्या ठिकाणी समाजाचे विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने साजरे होतील. यासाठी महापौर व सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल समाजाच्यावतीने नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी धन्यवाद व्यक्त केला.

मनपाच्या सर्वसाधारण सभेत माळी समाजाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महापौर रोहिणीताई शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेविका सुरेखा कदम, सुवर्णा जाधव, किशोर डागवाले, मंगलताई लोखंडे, नगरसेवक योगीराज गाडे, विजय पठारे, बाळासाहेब भुजबळ, दत्ता जाधव, नितीन भुतारे, परेश लोखंडे, जालिंदर बोरुडे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाले, नगर शहराचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी विविध माध्यमातून काम केले जात आहे. अनेक समाजाने मनपाचे ओपनस्पेसचा विकास करण्यासाठी मागणी केली होती, समाजाच्या चांगल्या कार्यास ते देण्यात आले आहे. या ओपनस्पेसचा समाज उन्नत्तीचे उपक्रम राबवावे, जेणे करुन समाजातील प्रत्येक घटकांचा विकास होईल.

याप्रसंगी भगवान फुलसौंदर, सुवर्णा जाधव, बाळासाहेब भुजबळ, किशोर डागवाले, नितीन भुतारे यांनीही महापौर, सर्वनगरसेवक, प्रशासना अधिकारी यांनी समाजाच्या विनंतीला मान देऊन जागा उपलब्ध करुन दिली. या जागेच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना चांगला उपयोग होईल, त्यासाठी सर्वजण प्रयत्नशिल राहून सर्वांचे आभार मानले.