अहमदनगर दौंड रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट ,डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पाची चाचणी

1
47

नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट : नगर -दौंड डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्प अकोळनेर ते सारोळा दुसऱ्या टप्प्याची चाचणी यशस्वी

नगर तालुक्यातील अकोळनेर ते सारोळा कासार डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत अकोळनेर ते सारोळा कासार ७ कि .मी. अंतराची चाचणी सोमवारी (दि. २५ ) रोजी घेण्यात आली. लवकरच नगर ते दौंड पर्यंतचे हे काम पुर्ण होणार असुन यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे . या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे .
गेल्या तीन वर्षापासुन नगर ते दौंड द्रुतगती ( डबललाईन ) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे . या पुर्वि नगर ते मनमाड ७ टप्पाची चाचणी घेण्यात आली.नगर ते मनमाड मधील ९६ कि .मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली.
मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो . मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता . तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता .त्यामुळे तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत . मात्र आता हा पुर्ण मार्ग डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे . तसेच या कामामुळे रेल्वे ताशी १२० प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे . तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे .पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे . सोमवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते दौड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज उप मुख्य अभियंता बांधकाम दीपक कुमार (अहमदनगर) यांनी सांगितले.
यावेळी सारोळा स्टेशन याठिकाणी रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्या हस्ते ५०० झाडे लावण्यात आली.

रेल्वे चाचणीच्या वेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार,
कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, सेक्शन इंजिनिअर आर डी सिंग ,सेक्शन इंजिनिअर अजय राणा,इंजिनिअर प्रशांत कुमार सिनियर सेक्शन इंजिनिअर रामजी कुमार,
आदी उपस्थित होते.

1 COMMENT

  1. दौंड – मनमाड रेल्वे लाईनचे दुहेरीकरण नक्की होईल, पण त्याचा सर्व सामान्य जनतेला काय फायदा, मोदी साहेबांनी पॅसेंजर रेल्वे बंद केल्याने बरेच स्टेशन फक्त क्रॉससिंग च्या कमला येत आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका कोणाच्या फायद्यासाठी होतोय.
    जय अंबानी, जय अदाणी, जय भाजीपाला

Comments are closed.