Monday, May 20, 2024

चैत्र नवरात्र… तुळजाभवानी मातेचे मंदिर मध्यरात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय

Tuljapur..तुळजाभवानी देवीच्या उपासनेत चैत्र नवरात्राला अनन्यसाधारण महत्व असून या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामुळे देवळात मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात. गर्दीच्या कारणामुळे तुळजाभवानी मातेचे मंदिर मध्यरात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. चैत्र पौर्णिमा पासून मंगळवार , शुक्रवार , रविवार व पौर्णिमा या दिवशी मंदिर रात्री 1 वाजता उघडणार आहे. 15 जुन पर्यंत हा निर्णय लागू असणार आहे, तुळजाभवानी देवीची सकाळची अभिषेक पूजा पहाटे 6 वाजता होणार आहे. उन्हाळी सुट्ट्या व चैत्र महिना यामुळे तुळजापूर भाविकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 14 एप्रिल ते 18 एप्रिल या काळात देवीची चैत्र पौर्णिमा साजरी होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles