Friday, February 23, 2024

दोन गावठी कट्टे ४ जिवंत काडतुसासह दोन आरोपी नगर तालुक्यात पोलिसांच्या ताब्यात

विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टे बाळगणारे 02 इसम 62,000/- रुपये किमतीचे 2 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसासह जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.

मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदाराकडून दिनांक 03/02/2024 रोजी इसम नामे विकास सुधाकर सरोदे रा. राहुरी हा व त्याचा साथीदारासह शेंडी बायपास या ठिकाणी व इसम नामे ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट रा. नेवासा व त्याचा साथीदारासह नागरदेवळे गावचे शिवारात कापुरवाडी गावाकडे जाणारे रोडवर गावठी कट्टे (अग्निशस्त्र) विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे दोन स्वंतत्र पथके नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आवश्यक सुचना देवुन पथके रवाना केली.
नमुद सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, संदिप चव्हाण, संतोष खैरे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड संभाजी कोतकर, प्रमोद जाधव, अरुण मोरे, यांनी अहमदनगर ते छ. संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास या ठिकाणी सापळा लावुन आरोपी नामे विकास सुधाकर सरोदे, वय – 23 वर्षे, रा. गुंजाळे ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीमध्ये 01 गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याचा साथीदार नामे लखन सुधाकर सरोदे रा. गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.
दरम्यान मिळालेल्या बातमीतील ठिकाणी नागरदेवळे गावाचे शिवारात वारुळवाडी गावाकडे जाणारे रोडवरुन आरोपी नामे ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट, वय – 33 वर्षे, रा. मोरे चिंचोरा, ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेवुन त्याचे अंगझडतीमध्ये 01 गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याचा साथीदार नामे भैया शेख पुर्ण नांव गांव माहित नाही. रा. कुकाणा, ता. नेवासा, जि. अहमदनगर हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.
वरील दोन्ही ठिकाणावरुन आरोपी नामे विकास सुधाकर सरोदे व ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट यांचे कब्जामध्ये 02 गावठी बनावटीचे कट्टे (अग्निशस्त्रे) 04 जिवंत काडतुस असा एकुण 62,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द 1) एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु.र.नं. 111/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे 2) भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. 99/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी नामे ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व पुणे, जिल्ह्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी, अवैध शस्त्रे बाळगणे, दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण – 09 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles