Tuesday, February 27, 2024

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्याच्या हवामानातही पुन्हा बदल झाला आहे. पुढील 24 तास राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट आल्याने बळीराजा मात्र चिंतेत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठावाड्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कोकणासह उत्तर महाराष्ट्रात सोमवारी जोरदार पाऊस झाला आहे, यामुळे तापमानातही घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात बहुतेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
पुढील 24 तासांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावारण पाहायला मिळणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. यासोबतच कोकणातही पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाकडून नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles