वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, 10 उमेदवारांची नावे जाहीर

0
19

वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी पाचवी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 10 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या यादीत मुंबईच्या तीन जागांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच याबाबत प्रतिक्रिया दिलेली.

यामध्ये मुंबई उत्तरच्या जागेसाठी बीना सिंह यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबई उत्तर पश्चिममधून संजीवकुमार कलकोरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दक्षिण मध्य मुंबई मधून अब्दुल खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.वंचितकडून रायगड लोकसभेच्या जागेसाठी कुमूदानी चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर धाराशिवमधून भाऊसाहेब अंधाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबारमधून हनुमंत कुमार सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रफुलकुमार लोढा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून गुलाब बर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पालघरमधून विजय म्हात्रे तर भिवंडीमधून निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.