महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड; ‘वंचित’ची अखेर महाविकास आघाडीत एन्ट्री

0
15

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. आजच्या बैठकीला मविआ नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवलं होते. आज झालेल्या बैठकीत ‘वंचित’चा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आलाय. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याविषयी माहिती दिलीय. महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना यासंबंधी पत्र पाठवण्यात आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जोरात तयारी सुरू केलीय. भाजपाच्या विरोधात लढा उभारण्यासाठी लहान-मोठ्या पक्षांना आघाडीत सामील करून घेतले जात आहे. अनेक गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सामील होण्याकरता वंचित बहुजन आघाडीकडून इच्छा व्यक्त केली जात होती.