सुसाट कारची दुचाकीला धडक, गाडी थेट हवेत उडाली अन्…थरकाप उडवणारा Video

0
16

पालघरमधील एका रस्त्यावरील ही अपघाताची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून वाहने सावकाश चालवण्याचा सल्ला दिला आहे.सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भयंकर अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. चालकाचा थोडासा निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो हेच या व्हिडिओमधून दिसत असते. सध्या अशाच एका भयंकर अपघाताच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
वाहन चालवताना वाहनचालकांकडून अनेकदा हलगर्जीपणा केला जातो. त्यामुळे भीषण अपघात होतात. अशा अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भरधाव कार आणि दुचाकीमध्ये हा अपघात झाला असून संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.