भन्नाट जुगाड…सिगारेट अन् आगपेटी लपवली चक्क चप्पलमध्ये

0
26

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका तरुणाने पायात चप्पल घातलेली दिसेल. त्यानंतर हा तरुण चप्पलमध्ये फसवलेला एक छोटा कप्पा उघडतो आणि काय आश्चर्य त्यात दोन सिगारेट लपवलेल्या असतात. त्यानंतर हा तरुण त्यातली एक सिगारेट काढतो. पुढे तो चपलीमध्ये फसवलेला दुसरा कप्पा उघडतो त्यात तीन चार आगकाड्या ठेवलेल्या असतात. त्यातली एक आगकाडी तो हातात घेतो आणि चपलीमध्ये फसवलेल्या आगपेटीच्या एका बाजूला ही आगकाडी घासतो आणि आगकाडी पेटते. त्यानंतर हा व्हिडीओ येथेच संपतो. तरुणाचा हा भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या जुगाडचा वापर करून हा तरुण लपून धुम्रपान करत असावा.https://x.com/HasnaZaruriHai/status/1787071708018450728