Saturday, May 25, 2024

केडगाव परिसरात श्रीरामपुरच्या तरूणावर तलवारीने वार…गुन्हा दाखल

श्रीरामपूरच्या तरूणाच्या डोक्यात तलवारीने वार केल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरातील केडगाव परिसरात घडला. याप्रकरणी जखमी अमोल अर्जुन आठरे (वय वर्ष 40, रा अतिथी कॉलनी श्रीरामपूर) यांच्या फिर्यादीवरून धीरज वाघ (रा. अतिथी कॉलनी, वार्ड नंबर ३, श्रीरामपूर) व त्याचा भाऊ (नाव, पत्ता नाही) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चारचाकी वाहनातून केडगाव येथून श्रीरामपूर येथे जात असताना रंगोली हॉटेलच्यापुढे पेट्रोल पंपाजवळ धीरजच्या भावाने त्यांचे वाहन थांबविले. अमोल यांनी वाहन थांबवून खाली उतरले असता धीरज तेथे आला व त्याने शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

हातातील तलवारीने डोक्यात दोन वार केले. रक्त येत असल्याने अमोल खाली बसले असता धीरजच्या भावाने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने पाठीवर, मांड्यावर, पोटरीवर मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान जखमी अमोल यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles