तुमच्या घरातील किचन सिंक खराब झाले आहे आणि ते कसे स्वच्छ करावे, हा प्रश्न पडला आहे का? तर आता काही काळजी करू नका. कारण तुमचं किचन सिंक नव्या सारखं कसं स्वच्छ करता येईल, यावर एका महिलेने जुगाड दाखविला आहे.व्हिडीओत दाखविल्यानुसार, गृहिणीने सर्वात आधी शम्पू घेतलं आहे. शॅम्पूचे तीन ते चार थेंब बेसिंगमध्ये टाकलं आहे. त्यानंतर एक रसाळ लिंबू घेऊन त्याला अर्ध कापून घेतलं आहे. आता जिथे शॅम्पू टाकलं आहे त्या ठिकाणी कापलेलं लिंबू चोळत चोळत संपूर्ण सिंकमध्ये पसरविलं आहे. सिंकला शॅम्पू-लिंबू दहा मिनिटं लावून ठेवा आणि नंतर जाड स्क्रबरनं घासून घ्या. घासल्यानंतर तुमचं सिंक पाण्याने धुवून घ्या. असा उपाय केल्याने तुमचा किंचन सिंक नव्यासारखा चमकेल, असा दावा महिलेने केला आहे.https://youtu.be/2WsQNZ-osPo?si=5hb0nFqhYBlFgI1u
- Advertisement -